Thursday 25 March 2010

ईस्राएल आणि भारत

ईस्राएल आणि भारत
काल महाराष्ट्र टाइम्सवर हा लेख वाचनात आला. ईस्राएलच्या अधिक्रुत व्यक्तीनी लिहिलेला हा लेख. लेख छानच लिहिला आहे. लेख वाचुन विचार आला की ही स्त्री लष्कराचे प्रशिक्षण घेउन तिच्या देशासाठी लढून आली आहे. लष्करामधे किती तरी गोष्टिन्ना, कसोट्यान्ना तोन्ड देत ती इथे पर्यन्त पोचली आहे. त्या मुळेच असेल कदाचित पण परक्यादेशा मधे सुद्धा ती आरामात फ़िरली.

पण तिला त्या पलीकडे या देशाची ओढ वाटली. तिने जितके काही फ़िरुन पहिल त्यातल आपल्या इथल्या कितीतरी जणान्नी आजपर्यन्त पाहिल नसेल आणि कदाचित बघु कधी तरी अस म्हणत कधीच बघणार नाहित. पुष्कर, वाराणसी, किंवा ह्रुषिकेश या सारखी शहरे ज्यांना आपल्याकडे पवित्र मानले आहे त्याला मला वाटत आपण भेत देण्यापेक्शा बाहेरचीच लोक जास्त जात असावीत.

गंगा, तिचा घाट, नर्मदा, बद्रिनाथ, केदारनाथ किती तरी पवित्र स्थळे आहेत ज्यांच्या दर्शनानीही आपली उन्नत्ति हो उ शकते. जिथे समाधि लावली तर खरोखर पर-ब्रह्माची भेट होइल. "तुझे आहे तुज पाशी, परि तू जागा चुकलासी॥" हेच खर. आपली संपत्ति ही आर्थिक नसुन आध्यत्मिक आहे आणि ती मिळवायचा यत्न केल्यास बाकी काही न मिळण्यासारखे नाहीये हे आपल्याला जेव्हा समजुन घेता येइल तेव्हा आपली प्रगती होइल.

No comments: