Wednesday, 5 August 2009

माती सांगे

एक छान मराठी कविता मिसळपाव या संकेत स्थळावर मिळाली. ती इथे छापत आहे. मूळ लिखाण इथे आहे.

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी
....

मला फिरविसी तू चाकावर,घट मातीचे बनवी सुंदर
लग्न मंडपी कधी असे मी कधी शवापाशी

वीर धुरंधर आले गेले,पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी

गर्वाने का ताठ राहसी,भाग्य कशाला उगा नाशसी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी

No comments: