Tuesday, 30 March 2010

आजचे कुटुंब

पोरींच्या डोक्यात हवा गेली आहे का? महाराष्ट्र टाइम्स मधे हा लेख वाचला... काही प्रमाणात गोष्टी पटल्या... पण त्या फ़क्त मांडल्या गेल्या आहेत. त्यावर काही solution, उपाय सांगितला नाहीये. आज काल मुली उच्च शिक्षित व्हायला लागल्या आहेत, त्याही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. आज अस कुठलही क्षेत्र नसेल की जे स्त्रीयांनी पादाक्रांत केल नसेल.

आज स्त्री पुरुष दोघांनाही नोकरी हवी आहे. दोघही शिकलेली, दोघांनीही स्वप्न पाहिलेली, मग कोणी नोकरी करायची कोणी नाही, दोघांनीही करायची तर मग मुलांचा काय? त्यांना कोणी पहायचा अणि कोणी वाढवायच? संस्कार कोणी करायचे? पाळणा घरात ठेवायच की आज्जी आजोबांना वेठीला धरायच? कारण आपली नोकरी/ career सांभाळताना आपले आई वडील हे सगळ करतील अस गृहीत धरण बरोबर नाही. मग त्यातून सुरु होते ओढाताण आणि झगड़े. पैशामधे सुख शोधताना नक्की काय सोडल जातय आणि कशाचा बळी जातोय हे लक्षातच येत नाही.

घरी जेवण कोणी काय बनवायचा पासून, घराची साफ़-सफाई, घरातल्या वस्तू कुठल्या असाव्यात अणि मुलांना कुठल्या शाळेत घालायच, काय शिकवायच इथ पर्यंतचे वाद. घर
म्हणल्यावर हजारो काम असतात, त्यातली कित्येक ज्याप्रमाणे माझी बायको म्हणते त्याप्रमाणे thankless कामही असतात. ऑफिस प्रमाणे आखून रखून दिलेली आणि प्रत्येक कामाच श्रेय मिळणारी नसतात. ती कोणी करायची आणि कधी करायची यातच बरेचसे वाद असतात. माझ्या आजुबाजुला बरीच जोडपी मी पहिली आणि पाहतोय. सगळीकडे हे असच, वादाच्या स्वरूपात आहे अस नाही. पण एक मात्र सगळीकडे सामान आहे ते म्हणजे पैश्याची भूक.

संगणकावर काम करणारी हाय-टेक जमान्यातली लोक. बायको बरोबरीने कमावते आहे म्हणून घराच्या कामामधे काही सूट देतील तर तस नाही. बर बायकोनी काम केल नाही तर चालेल का तर तेही नाही. माझे किती तरी मित्र आणि बरोबरीचे काम करणारी लोक मी पहिली आहेत जी अगदी proudly सांगतात की आम्ही स्वयापाकघरामधे पाउल ठेवत नाही. यावर काय बोलाव सांगाव काळात नाही.

बर्‍याचश्या मुली ह्या स्वयपाकघर आणि घर कामामधे रमणार्‍या असतात तर पुरुष घर चालवण्यासाठीच्या कामामधे, अस माझा स्वत: मत आहे. पूर्वी याच धरती वर कामाची विभागणी करुन संसाराचे रहाट-गाडगे त्याप्रमाणे सुरळीत चालायचे. पैसा मिळवून आपण नक्की पुढे चाललो आहोत की पाश्चात्यांच अन्धानुकरण करत त्यांच्याच विभक्त कुटुंबाच्या संकल्पनेवर चाललो आहोत. यावर जरा थांबून विचार करायला हवाय. आपल्या values/ संस्कार, रूढी, परंपरा आपण जपल्या नाहीत तर कोणी सांभालाव्यात?

सकाळी लवकर उठून व्यायाम करुन, शुचिर्भुत होउन, देवाची पूजा करुन (
तुळशीची पूजा करुन) दिवसाची सुरुवात करावी. आपले काम करुन संध्याकाळी घरीं आल्यावर शुभंकरोती म्हणून देवा पुढे दिवा लावावा. थोरा मोठ्यांना नमस्कार करावा. लवकर आणि हलके जेवण जेवून दिवसाची सांगता करावी. आपण कमावून आणतो त्यातला एक भाग देवासाठी काढून ठेवावा, एक भाग समाज कार्यासाठी ठेवावा अणि एक भाग आपल्या स्वत:साठी खर्चा करण्यासाठी ठेवावा.

हे एवढ केल तर मला वाटत रोज सुखानी झोपही लागेल आणि आयुष्य बरचस साध,
सरळ आणि सोप्प होईल. काय म्हणता?